जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Tuesday, 4 September 2018

BANJARA NEWS//बंजारा समाजास एस टी प्रवर्गात समावेश करण्यात यावे .मा. कांतिलाल नाईक*

न्युज प्रतिनिधी:करसन राठोड____


*बंजारा समाजास एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे बंजारा समाजाच्या लोकसंख्यानुसार त्यांना सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आरक्षण व बंजारा समाजचे तांड्यांणा तिनशे पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तांड्यांणा स्वतंत्रत ग्रामपंचायत महसुल दर्जा द्यावा*
*असे प्रतिपादन ठाने येथील अखिल भारतीय बंजारा सेनेच्या मेळाव्या प्रसंगी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष. मा.श्री. कांतिलाल नाईक यांनी केली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन केले*
*सुरुवातीस संत श्री सेवालाल महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करुण कार्यक्रमास सुरवात करण्यात आली*

*या प्रसंगी बंजारा समाजातिल गुणवंत विध्यार्थांचे सत्कार करण्यात आले तसेच बंजारा समाजतिल जेष्ठ नागरीकांना समाजसेवकाना  संघटनेकडुन बंजारा रत्न पुरस्कार व स्मृतीचीन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले अखिल भारतीय बंजारा सेनेचे कार्यकर्तांना बंजारा सेना पदाधिकारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी मा.मिलींद पवार ( नवी मुंबई ) डाँ.चरन जाधव (भाईंदर ) मा रमेश राठोड ( पुणे ) आदी मान्यवराचे भाषने झालीत*
*या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन चरणदास पवार तेलंगाना प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेना कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. कांतिलाल नाईक होते*
*मा.श्री. करसनभाऊ राठोड ( राष्ट्रीय अध्यक्ष=अखिल भारतीय बंजारा युवा सेना ) मा.श्री. जिनकर राठोड ( प्रदेश अध्यक्ष= ( अ.भा.बंजारा युवा सेना ) डाॅ साईदास चव्हाण ( प्रदेश अध्यक्ष= बंजारा सेना ) मा.दिलीप राठोड ( राष्ट्रीय महासचिव बंजारा युवा सेना ) मा.सुनिल जाधव ( मुंबई प्रदेश अध्यक्ष=बंजारा सेना ) मा.सौ.चंद्रकला जाधव ( मुंबई प्रदेश अध्यक्ष=बंजारा महिला सेना )मा. दिलीप जाधव ( ठाने ) मा.संजय आडे ( यवतमाळ ) मा.संजय राठोड ( पुसद ) मा.मिलींद पवार डॉ चरन जाधव सौ.विद्याताई चव्हाण ( कल्याण ) दुर्गा पवार ( यवतमाळ )  मा.मोरसिंग राठोड ( बडगांव ) मा.गुलाब जाधव ( औरंगाबाद )*

     
      *विषेश अतिथि*
*मा.श्री. संजय आडे ( विदर्भ प्रदेश अध्यक्ष=बंजारा युवा सेना ) मा.श्री. मिथुन राठोड ( पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष=बंजारा युवा सेना ) मा.श्री. संजय राठोड ( विदर्भ संपर्क प्रमुख=बंजारा सेना ) मा.श्री. लालचंद चव्हाण ( जळगाव जिल्हा अध्यक्ष=बंजारा सेना ) मा.श्री. गुलाब जाधव ( औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष=बंजारा सेना ) मा.श्री. रुशीकेश चव्हाण ( पुणे जिल्हा अध्यक्ष=बंजारा विध्यार्थी सेना )*

   *बंजारा सेना पदाधिकारी*

*मा.श्री. दिलीप जाधव ( ठाणे जिल्हा अध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. सुरेश जाधव ( ठाणे जिल्हा सचिव=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. लखन आडे ( ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. पृथ्वीराज चव्हाण ( नवी मुंबई अध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. सुनिल पवार ( ठाणे जिल्हा उपाध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. भरत राठोड ( उल्हासनगर तालुका अध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. गोदाजी राठोड ( ठाणे जिल्हा अध्यक्ष=बंजारा सेना )*
*मा.श्री. संतोष आडे ( ठाणे जिल्हा उपाध्यक्ष=बंजारा सेना )*
*मा.श्री. अनिल राठोड ( ठाणे जिल्हा सचिव=बंजारा सेना )*
*मा.श्री. दशरथ जाधव ( घोडबंदर विभाग अध्यक्ष=बंजारा सेना )*
*मा.श्री. दशरथ राठोड ( घोडबंदर विभाग उपाध्यक्ष=बंजारा सेना )*
*मा.श्री. योगेश राठोड ( ठाणे जिल्हा अध्यक्ष=बंजारा विद्यार्थी सेना )*
*मा.श्री. संदिप चव्हाण ( अमरावती *जिल्हा अध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. निरंजन राठोड ( यवतमाळ जिल्हा सचिव=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. नवीन राठोड ( यवतमाळ जिल्हा अध्यक्ष=बंजारा विद्यार्थी सेना )*
*मा.श्री. रवी राठोड ( अमरावती जिल्हा उपाध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. रविंद्र राठोड ( नवी मुंबई उपाध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. रंजीत राठोड ( उसमानाबाद जिल्हा अध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*मा.श्री. शिवाजी चव्हाण ( हिंगोली जिल्हा अध्यक्ष=बंजारा युवा सेना )*
*कार्यक्रमाचे सुत्यसंच्यालन निरंजन राठोड यानी केले तर आभार प्रदर्शन ऋषिकेश चव्हाण यानी केले*
*आयोजक अखिल भारतीय बंजारा सेना मुंबई प्रदेश*

Download our official btv banjara news app..
Click here-


Watch the banjara news online video on 
BANJARA LIVE YOUTUBE CHANNELS



Read banjara news paper बंजारा पुकार

Download बंजारा पुकार News paper...
Click here....




Share:

Monday, 3 September 2018

BANJARA NEWS//राष्ट्रीय बंजारा टायगर्स च्या टिटवाळा शहराध्यक्ष पदावर "सोमसिंग पवार" यांची निवड


कल्याण(प्रतिनीधी)- *राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या "टिटवाळा  शहराध्यक्ष" पदावर दि.2'सप्टें-2018.रोजी येथील बंजारा समाजाचे 'युवा कार्यकर्ते-श्री.सोमसिंग पवार' यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण यांनी निवड केली.*
      *सोमसिंग पवार हे बंजारा समाजातील युवा कार्यकर्ते असुन ते नेहमी टिटवाळा शहरासह कल्याण तालुक्यातील बंजारा समाजबांधवांच्या  सुखःदुखामधे,अडी-अडचणीं व समस्या सोडविण्यात अग्रेसर असतात.त्यामुळे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण यांनी घेतली आणी लगेचच "टिटवाळा शहराध्यक्ष" या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.*
    *त्यांच्या या निवडीबद्दल  संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मदनभाऊ जाधव,अमृतजी मेडकर,विरेंद्रजी रत्ने,राष्ट्रीय महासचिव-वाल्मिकभाऊ पवार,राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय संघटक-मुरलीभाऊ चव्हाण,राष्ट्रीय खजिनदार-राजु नाईक,राष्ट्रीय प्रवक्ता-ॲड.अविनाशभाऊ जाधव,राष्ट्रीय सचिव-गणपती राठोड,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष-सुजाताताई आडे,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष-भारतभाऊ राठोड,प्रदेश संघटक-जगदिशभाऊ राठोड,प्रदेश उपाध्यक्ष-विलास राठोड,विलास जाधव,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख-मच्छिंद्र चव्हाण,मुंबई प्रदेशाध्यक्ष-रोहित राठोड,मुंबई सचिव-सुरेश पवार,ठाणे जिल्हाध्यक्ष-अनिल चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष-गजानन जाधव,जिल्हा सचिव-शंकर पवार,जिल्हा सरचिटणीस-मनोज राठोड,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख-भास्कर आडे,नवीमुंबई अध्यक्ष-सोनुसिंग पवार,पालघर जिल्हाध्यक्ष-रवि राठोड,कल्याण तालुकाध्यक्ष-अशोकभाऊ राठोड,तालुका सचिव-केवलसिंग तंवर,तालुका सरचिटणीस-अजमल जाधव,मोहने शहराध्यक्ष-राम राठोड,अटाळी-आंबिवली शहराध्यक्ष-गोकुळ राठोड,उपाध्यक्ष-गबरु राठोड,इ.पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विविध राजकिय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रामधील मान्यवरांनी अभिनंदन केले ..

DOWNLOAD OUR BTV BANJARA NEWS OFFICIAL APP NOW...
Click here...

Watch Now Banjara status ,video song 



Share:

Thursday, 30 August 2018

Banjara news //कल्याण येथील नियोजित "संत सेवालाल महाराज व देवी जगदंबा माता मंदिर" साठी जागा व बांधकामासाठी आमदार निधी उपलब्ध करुन द्यावा .

(आमदार-नरेंद्र पवारसाहेब यांच्याकडे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची निवेदनाद्वारे मागणी.)*


मोहने,ता.कल्याण(वार्ताहर प्रतिनीधी)दि.30'सप्टें.- *मोहने-आंबिवली(पूर्व),ता.कल्याण येथे बंजारा समाज गेल्या 25-30 वर्षापासून वास्तव्यास असून या समाजाचे 'आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज आणि देवी जगदंबा माता मंदिर' गेल्या 20-25 वर्षापासून मोहने पोलिस चौकी मागील मोकळ्या जागेवर स्थापन आहे.या मंदिरामधे दररोज हा समाज सकाळ-संध्याकाळ पुजा-अर्चना करीत असतो.मात्र गेल्या काही वर्षापासून या समाजाकडून "मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक श्री.रहेजा" हे त्या मंदिरावरील जागेवर ताबा मागत असुन ते या समाजाला वेळोवेळी आपल्या काही कार्यकर्त्यां(गुंड) पाठवून या समाजातील लोकांना धमकी देत आहेत की,ही जागा आमच्या ताब्यात द्या नाहीतर तुमच्यावर पोलिस कारवाई करु आणि तुम्हाला ईथून पळवून लावु.*
       *येथील समाजबांधवांनी हि माहिती "राष्ट्रीय बंजारा टायगर्स" च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कथन केली आणि लगेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,मुंबई विभागीय सचिव-सुरेश पवार,कल्याण तालुकाध्यक्ष-अशोकभाऊ राठोड,तालुका सचिव-केवलसिंग तंवर,मोहने शहराध्यक्ष-राम राठोड,अटाळी-आंबिवली शहराध्यक्ष-गोकुळ राठोड,समाजसेवक-विठ्ठलभाऊ राठोड, व अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी "कल्याण पश्चिम चे कार्यसम्राट आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब" यांना भेटून सदर घटनेची माहिती देऊन "निवेदन" सादर केले.*

        *यावेळी,आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांनी राष्ट्रीय बंजारा टायगर्स च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले की 'संत सेवालाल महाराज व जगदंबा देवी' या दैवतांना मी देखील मानत असुन,या मंदिराला जागा उपलब्ध करुन देण्याचे माझे आद्य कर्तव्य आहे.नुसती जागा च नाही तर,या मंदिरांच्या बांधकामासाठी मी माझ्या "आमदार निधीतून हे मंदिर बांधण्याचे प्रयत्न करेन" असे आश्वासन देतो.यावेळी आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांना आश्वासन दिल्याने त्यांचे आभार मानले व प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,आणि ईतर मान्यवर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.*


Download our official News App
BTV Banjara youtube channel present,
BTV Banjara news app.. .

Click here...

https://www.mediafire.com/file/labejy35iuflew0/_BTv_BANJARa_7713285.apk/file

जय सेवालाल जय गोर
बंजारा चालु घडामोडी,बातमी..
BTv banjara YouTube channel present,

🙏BTV BANJARA NEWS🙏

आत्ताच लिंक ला click करुन download करा..व जास्तीत link share करा...

बंजारा videos, songs,


Share:

BANJARA NEWS//बंजारा सेनेतर्फे बंजारा रत्न पुरस्कार. बंजारा सेना पदाधिकारी पुरस्कार. विद्यार्थी गुणगौरव सोहळा.*


*!! जय सेवालाल  जय वसंत जय गोर !!*
*सर्व बंजारा समाजबांधवांना कळवीन्यात येत आहे की  अखिल भारतीय बंजारा सेना या सामाजिक संघटनेतर्फे*
*बंजारा रत्न पुरस्कार. बंजारा सेना पदाधिकारी पुरस्कार. विद्यार्थी गुणगौरव सोहळा.*
*रविवार दि.02/09/2018 रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे*
*प्रशस्ति पत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे*
*तरी आपन मोठ्या संखेने सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपनास नम्र विनंती!!!*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कार्यक्रमाचे अध्यक्ष
*मा.श्री. कांतिलाल नाईक*
( राष्ट्रीय अध्यक्ष= बंजारा सेना )
      कार्यक्रमाचे उदघाटक
*मा.श्री. चरनदास पवार*
( तेलंगाना प्रदेश अध्यक्ष= बंजारा सेना )

         ** *प्रमुख अतिथि* **
*मा.श्री. करसन राठोड*
राष्ट्रीय अध्यक्ष= बंजारा युवा सेना
*मा.श्री दिलीप राठोड*
राष्ट्रीय महासचिव=बंजारा युवा सेना
*मा.श्री.डाॅ साईदास चव्हाण*
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष= बंजारा सेना
*मा.श्री. जिनकर राठोड*
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष= बंजारा युवा सेना
*मा.श्री. सुनिल जाधव*
मुंबई प्रदेश अध्यक्ष= बंजारा सेना
*मा.सौ.चंद्रकला जाधव*
मुंबई प्रदेश अध्यक्ष= बंजारा महिला सेना
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


दिनाक - 2/09/2018 रविवार
वेळ - 10:00 ते 2:00
ठिकाण - गोल्डन बॕन्कवेट,
पहिला माळा,सिदेश्वर कमान,सुरज वॉटर पार्क च्या समोर,घोडबंदर रोड ठाणे (पश्चिम)

*आयोजक - अखिल भारतीय बंजारा सेना,युवा सेना,महिला सेना,विद्यार्थी सेना मुंबई प्रदेश*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


BANJARA NEWS APP DOWNLOAD
CLICK HERE..
https://www.mediafire.com/file/labejy35iuflew0/_BTv_BANJARa_7713285.apk/file


Watch all banjara news.. .on our official website. ..


Share:

Wednesday, 22 August 2018

बंजारा – बोली भाषेचा सामान्य परिचय

बंजारा – बोली भाषेचा सामान्य परिचय
भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुनच नव्हे तर सर्व प्रकारच्या लोकांकडुनच केली जाते. भारतातील प्राचीन जनजातींमधील बंजारा ही एक प्रमुख जात आहे. मुख्यत्वे भारतातील वीस प्रांतामध्ये सतरा नावाने व उप नावाने बंजारा ओळखले जातात.ज्यांची जन संख्या ही चार करोड पेक्षा जास्त असु शकेल असे वाटते. भारत देशाची एकमात्र बंजारा जमात आहे जिची बोली, वेशभूषा, गोत्र हे एकसारखेच आहे. बंजारा आजही आपल्या विभिन्न प्रांतात असलेल्या आपल्या जातभाईंना आपल्या मातृ बोलीत बंजारा/गोरमाटी भाषेत बोलतात. विशीष्ट वेषभुषा, केशभुषा त्याची आपली ओळख करुन देणारी आजही काही प्रांतांमध्ये सुरक्षित आहे. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे आजही गोत्राच्या आधारेच लग्नसंबंध जुळवीण्यात येतात अशी ही एकमात्र बंजारा जात भारतीय जमात आहे.
आपल्या देशात सामान्यतः कोणत्याप्रकारचे धंदा-व्यवसाय करतात या आधारावर जात कोणती आहे हे ठरते होते. बनज करणारा बंजारी त्यात लवन (मीठ) व्यापार करणारे लभान, लंबाडा अशा व्यावसायिक नावाने ही जमात ओळखली जाते. वास्तविकतः बंजारा हे नाव अन्य असे अरबी, फारसी, लोकांनी यांना दिले आहे. हे आपआपसात बंजारा नाहीतर गोरमाटी नावाने परिचित असतात. परंतु संस्कृत मध्ये गो म्हणजेच गाय-बैल यांची राखण करणारे यांना पाळणारे म्हणजेच गोर समजले गेले. पुढे यांचे वंशजांनी गोत्र हे नाव धारण केले. “आदि भारत” पृष्ठ नं.६५,६६ श्रीपाद डांगे गोरमाटी,गोर-माणसाची बोली म्हणजेच गोर बोली. माटी-म्हणजे मनुष्य , माझी मातृभाषा गोर-बोली बंजारा बोली आहे. “बंजारा बोली”डॉ इब्राईम ग्रिर्यसन आपल्या भाषा सर्वेक्षण ग्रंथात पहिल्यांदा बंजारा, लंबाडा, बोलीचा उल्लेख केला आहे. “स्वतंत्र भारतातील जाती तथा भाषांची समस्या”- बोरीस क्लूयेव अनु. नरेश बेदी पृष्ठ ५९ उत्तर दक्षिण भारतात बोलली जाणारी बंजारा, लंबाडी, बोलणाऱ्यांची संख्या १२७२०१६ इतकी आहे. डॉ इब्राईम ग्रिर्यसन च्या नंतर डॉ.गणेश देवी या भाषा संरंक्षण करत आहेत ज्यामुळे भारताची जिवीत बोलभाषेची संख्या समोर येऊ शकेल. कोणत्याही बोली भाषेचा अभ्यास करण्यासाठी भुगोल आणि मानवाचा वंशज याचे ज्ञान असणे जरुरीचे आहे. बंजारा बोली भाषेचा प्रकृति पाणी, वायु यांचा आधार घेऊन व संस्कृतीच्या अभ्यासातुन माहीती मिळते कि, बंजारे मुलस्थान गोर स्थान, गोरबंद नदी तथा गोर डोंगराळ म्हणजेच सिंधु घाटी सभ्यता यांचा भूभाग आहे. रक्त,नाक,कपाळ व हाडांची मापे यावरुन असा निष्कर्ष निघतो की, बंजारा गोर वंशी प्रायः आर्य आहे. बंजारा बोलीचे मुळ रुप ध्वनी विज्ञान स्वरांचे वर्गीकरण रुप विज्ञानन व्याकरण अर्थ विज्ञान, पारीवारीक वर्गीकरण आम्ही पाहातो. बंजाराबोली ही आर्य बोली तसेच मुळ भारोपीय भाषा परिवाराची बोली आहे. तात्पर्य बंजारा जमात काही शतकांपुर्वीपासुन काही भूभागावर वसलेली आहे. ज्या कारणास्तव त्यांची आपल्या कबील्या (समुह) मध्ये अंतर्गत व्यवहार बोलाचाली साठी ज्या बोलीचा उगम झाला ती बंजारा बोली आहे.
भाषा वेज्ञानीक मानतात की जगात सात हजार भाषा जीवंत आहेत. आज भारतात २२ भाषांना मान्यता आहे.२००१ च्या जनगणनेच्या आधारावर १२२ भाषा प्रचलीत आहेत. तर आपल्या देशात मातृभाषेची संख्या १६५२ मानली जाते. “बंजारा बोलीचे विभाजन ” देशातील सोळा प्रांतात बंजारांचे तांडे अधिक प्रमाणात दिसुन येतात. बंजारा बोली व त्यावर राजभाषेचा परिणाम च्या अभ्यासासाठी मोठया प्रमाणावर विभाजन करु शकतो. एक उत्तर मध्य भारत ज्यामध्ये पंजाब, हरियाना, दिल्ली, -ाारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र (आर्यभाषा) दक्षिण भारतामध्ये आंध्र, कर्नाटक, गोवा, आणी उत्तर तामीळनाडू – (द्रविड भाषा प्रांत) विदेशामध्ये पाकीस्तान, सिंध, बलुचीस्थान,अफगानीस्थानामध्ये बंजारा बोली बोलली जाते. मी जवळजवळ सगळया प्रांतातील बंजारा लोकांना तीथे जाऊन त्यांची भेट घेतली आहे. व मला असा अनुभव आला आहे की, बंजारा बोलीवर स्थानिक तसेच राजभाषेचा परिणाम -ााल्यामुळे बंजारा बोली स्वरुपाची बोली दिसुन येते. भारत-महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गोवा, उत्तर तामीळनाडू मध्ये बंजारा बोलीवर सामान्यतः दहा टक्के परिणाम स्थानिक भाषेचा झाला आहे. नव्वद टक्के मूळ बंजारा बोली आणि लोकसाहित्य इथे आजही सुरक्षीत आहे. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड, पुर्व गुजराथ आणि दक्षिण राजस्थान मध्ये बंजारा बोलीवर २० टक्के परिणाम झालेला असुनही बंजारा ८० टक्के बंजारा बोली व त्यांचे लोक साहित्य जीवंत आहे. पंजाब हरियाना उत्तर राजस्थान, पश्चिम गुजराथ मध्ये बंजारा बोली तांडयावर आजही बोलली जाते. तर शहरात राहणारे बंजारा बोलीवर गुजराथी,राजस्थानी भाषेचा परिणाम जास्त झाल्यामुळे मुळ बंजारा बोली मिश्रीत स्वरुपात इथले लोक बोलतात दिसुन येते. पंजाब हरियाना दिल्ली, ओरीसा ग्रामीण भागात बंजारा बोली बोलली जाते तर शहरात व महानगरामध्ये वसलेले बंजारे,बंजारा बोली समजतात पण स्पष्टपणे बोलु शकत नाहीत. उत्तर भारतामध्ये बंजारा बोली नाममात्र राहीली आहे. नवीन पीढी बंजारा बोली पूर्णतः विसरुत चालली आहे.केवळ जात प्रमाणपत्रावर बंजारा जात लिहीत आहेत. या प्रमाणे एक बंजारा बोली बेल्ट दाखवुन बंजारा बोली ची आजची स्थीती आमच्या समोर स्पष्ट होइल. बंजारा बोली व हिंदी भाषेमध्ये समानता अधिक असल्यामुळे उत्तर भारतामध्ये बंजारा बोली वर हिन्दी भाषा मिश्रीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. दक्षिण भारतामधील भाषा व बंजारा बोली यात विषमता जास्त आहे. त्या कारणास्तव तेथे मुळ बंजारा बोली जिवंत आहे. दक्षिण भारतामध्ये बंजाराबोली दहा टक्के नुसार पूर्णतः जीवित आहे. विशेषतः बंजाराबोली आणि लोकसाहित्यावर खुपमोठे साहित्य लिहीले जात आहे. बंजारा बोलीची आपली कोणतीही लीपी नसल्या कारणाने दक्षिण भारतामध्ये तेलगु तामिळ, कन्नड आणि मराठी लिपी मध्ये बंजारा साहित्य लिहीले जात आहे. महाराष्ट्रात बंजारा लिपी ही देवनागरी भाषेत लिहीली जात आहे. आतापर्यंत लिहीलेले मासिक पत्र, पत्रिका बंजारा बोली कुठे चालते तर कुठे ती बंद झालेली आहे. त्याच प्रमाणे बंजारा बोलीमध्ये आतापर्यंत दक्षिण भारतामध्ये लहान मोठी आठ ते दहा चित्रपट निर्माण झालेले आहेत.त्याच प्रमाणे दक्षिण भारतामध्ये बंजारा बोली स्थानिक भाषेतील बरेचशे शब्द आपल्या बोलीमध्ये आणुन एक प्रकारे बंजारा बोली समृध्द करण्याचा प्रयत्न दक्षिण भारतात होत आहे. बंजारा बोली आणि तिचे साहित्य अन्य भाषेचा परिणाम होऊन सुध्दा आपल्या वेगळया बोलीच्या रुपात आपली स्वतंत्र ओळख दक्षिण भारतातील बंजारा बोलीत आढळुन येते.
“बंजारा बोलीचे रुप-स्वरुप” बंजारा बोलीवर भाषा विज्ञान तथा भाषाशास्त्र च्या खोलातुन अभ्यास झालेला नाही. बंजारा लोकसाहित्यावर अनुसंधानात्मक अभ्यास चालु आहे. परंतु बोलीवर शेाधकार्य म्हणावे तसे झालेले पहावयास मिळत नाही. डॉ.नेमीचंद जैन ने भीली का भाषा शास्त्रीय अध्ययन ज्या आवडीने केले आहे ते एक आदर्श भारतीय बोलीचा अध्ययन ग्रंथ आहे. याच ग्रंथाला आदर्शग्रंथ मानुन बंजारा बोलीचे अध्ययन या प्रमाणेच होणे जरुरीचे आहे. बंजारा लिपी जरी नसली तरी आज दोन करोड च्या जवळपास बंजाऱ्यांच्या कष्टातुन ती सुरक्षीत बोली आहे. बंजारा बोलीचे स्वरुप पाहुन माहीत पडते की, इंडो-आर्यन बोलींमधील बंजारा एक प्राचीन बोली आहे.ही आजपर्यंत बदलत्या रुपामध्ये पण जीवित आहे.याचे महत्वपुर्ण कारण म्हणजे अन्य समाजापासुन काही शतकांपासुन बंजारा तांडा दुर रहात आहे. आपण भले व आपला तांडा भला यामुळे नागरी भाषा समाजापासुन दुर राहील्यामुळे ती प्रवाहीत होत आली आहे. तसे या जमातीतील तांडे लदेणी व्यापारासाठी अठराव्या शतकापर्यंत देश-विदेशामध्ये फिरत राहीले ज्या मुळे देशी-विदेशी शब्द पण बंजारा बोलीत दिसुन येतात.
बंजारा मातृबोलीला जीवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते बंजारा माता भगीनींनी बंजारा स्त्री ही आता-आता पर्यंत सुध्दा अन्य कोणत्याही भाषेच्या व्यक्ती सोबत बंजारा बोली मध्येच बोलते. बाजार हाट (बाजार) करतांना ती बंजारा बोलीचाच वापर करते, ज्या मुळे लाभ तर झाला आणि हानी ही झाली की, जात लपवण्याची प्रवृत्ती काही अददीपर्यंत बंजारांमध्ये निर्माण झाली. आपली जात ओळखु येऊ नाही म्हणुन बंजारा बोलीमध्ये सार्वजनीक रुपात बंजारा लिहीता वाचता येणारा माणुस पण एका वेळी घाबरत होता. त्याचे दुसरे एक कारण म्हणजे बंजारा जात इ.स.१८७१ च्या गुन्हेगार, जमाती मध्ये कायदयाने जन्मजात जरामपैशा जाती घोषीत केली होती. बोलण्यावरुन जात ओळखली जाते. पोलीस येऊन पकडुन नेतील या कारणामुळे सुध्दा बंजारा बोलीत बोलण्यासाठी बंजारा लोक घाबरत.
बंजारांची देशात तत्सम तथा उप जाती पण विभिन्न धंदा, व्यवसायाच्या कारणामुळे सुध्दा बोलीच्या उपबोलीय समजली जाते जसे ढाढी,ढालीया, लभान,सनार,नाव्ही, जोगी,नट बामधिया, बाजीगर, कांगसी, सुगाली, गंवारीया, लमाणी,लदेणिया, सारखी बंजारा आदि भाषांसोबत बंजारांनी धर्मांन्तर केले जसे शिख गुरुमुखी, परिणाम इसाई, अॅग्रेजी परिणाम तो मुस्लीम ऊर्दु चा परिणाम बंजारा बोलीत दिसुन येतो. याच्या बरोबर बंजारा बोली मध्ये (आपले आपण जातभाई समजतात) त्यामुळे गुप्त बोलीचे काही शब्द व वाक्याचा प्रयोग पण ते करतात. ज्याला फारसी बोली म्हटले जाते. अन्य भाषेचा आवाज मिलावटी उच्चारण पध्दतीचा परिणाम बंजारा बोलीवर झाला आहे. परंतु अर्थ बदलला नाही.”भाषा अभ्यासक आणी बंजारा बोली” डॉ. गिर्यसन आपल्या भाषा सर्वेक्षण ग्रंथामध्ये बंजारा लमाणी भ्रमणशील बोली असे म्हटले आहे. ज्यामुळे ते राजस्थानी बोलीचे पश्चिमी रुप मानले जाते. पृष्ठ क्र. ३१८ भाषा सर्वेंक्षण अनु डॉ.उदय नारायण तिवारी तो डॉ.प्रेम प्रकाश रस्तोगी बंजारा बोलीला राजस्थानी बोली मानतात ज्यांची जन संख्या १५८५०० पृष्ठ ११४ भाषा विज्ञान डॉ.देवेन्द्र कुमार शास्त्री आपल्या भाषा शास्त्र आणि हिन्दी भाषा की रुपरेखा नावाच्या ग्रंथामध्ये जिसाफददीन अहमद बंजारा बोलीचा उल्लेख करतात पृष्ठ क्र. १३४ डॉ. भोलानाथ विवारी बंजारा बोलीला पंजाबी मिश्रीत एक बोली मनतात.पृष्ठ १४० भाषा विज्ञान शब्द कोष डॉ. राजेंद्र व्दिवेदी आपल्या भाषा विज्ञान ग्रंथात लंबाडी बोलणारांची संख्या ३,३२,९१७ पृष्ठ ७८५ राजस्थानी भाषा के अध्येता डॉ.सिताराम लालस प.राजस्थानी हिन्दी लभ्भानी बोली चा संदर्भ देतात. पृष्ठ १५ हिरालाल शुक्ल आपल्या जनभाषा और साहित्य नामक ग्रंथामध्ये आर्यभाषा सामुहीक परिवाराची बोली मानतात. पृष्ठ १४० घुम्मकड शास्त्र चे लेखक राहुल सांकृतांयन बंजारा बोलीला राजस्थानी बोली मानतात. पृष्ठ क्र.४६ आज बंजारा बोलणा-यांची संख्या देश-विदेशात पाच करोडच्या जवळपास असुनही भाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही. बंजाराबोली विकासासाठी देवनागरी लिपीमध्ये पाठयपुस्तके तयार करावयास हवे, ज्या मुळे बंजारा बोलीचा विकास होऊ शकेल. भाषेचा दर्जा प्राप्त होईल व शासकीय सहयोगामुळे बंजारा भाषा फलती-फुलती राहील. तीचे अस्तीत्व जास्त काळ टिकुन राहील. घुम्मकड च्या कारणामुळे ती व्दिभाषीय बनली आहे. शासकीय आधार मिळाला तर बंजारा बोलीला अंतर्गत व्यवहारात गौण रुप प्राप्त होणार नाही. बंजारा बोलणाऱ्यांच्या संखेत वाढ होत राहील.
संत कबीरांनी म्हटले आहे संस्कृत कुपजल भासा बहता नीर त्याच प्रमाणे ४ कोसपर पानी बदले दस कोस पर बानी. बंजारा घुम्मकड असल्याने भारतीय बोली भाषेचा परीणाम बंजारा बोलीवर दिसुन येतो. जसे महाराष्ट्रात मराठी, गुजराथ मध्ये गुजराथी, राजस्थान मध्ये राजस्थानी, मध्य प्रदेशात हिन्दी, कर्नाटकात कानडी, आंध्रात तेलगु, शब्द बंजारा बोलीने ग्रहण केले आहे. आजकाल इंग्रजी शब्दही बंजारा बोलीत येऊ लागले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरुजीनी खरे म्हटले आहे की, भारतातील कथीत शेकडो भाषा आमच्या साठी एक प्रिय विषय आहे. डॉ. गणेश देवी साहित्य अकादेमी या प्रिय विषयावर काम करत आहेत. कोणत्याही जाती जमातीतील पंथ, धर्म संप्रदाय सण-समारंभ रितिरिवाज सामाजिक, सांस्कृतिक , पारिवारीक, संस्कार-सभ्यता आणि संस्कृती समजण्यासाठी व ओळखण्यासाठी त्यांची बोली ही एकमात्र किल्ली आहे. तरीपण धर्मांतरापासुन आपली संस्कृती इतिहास आणि बोलीवर परीणाम झालेला दिसुन येतो.
डॉ.गोवर्धन बंजारा
अहमदाबाद, गुजरात

Share:

बंजारा तिज विषयी जाणुन घ्या...

तीज उत्सव म्हणजे बंजारा स्त्र्यियांचा व मुलीचा आवडता उत्सव होय पावसाळयातील श्रावण महिना साजरा करण्यात येतो . पूर्वी पावसाळयात “लदेणी” होत नव्हती. बंजारा समाज एका ठिकाणी स्थिरावल्यानंतर या काळात लग्नकार्य करीत असत. लदेणी काळात दोन तांडे पावसाळयानंतर विखुरल्या गेले की, पुन्हा भेटीची शक्यता फारच कमी असायची. तेव्हा आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिन्यात लग्न झालेल्या मुली माहेरी येत असत. या वेळी हा “तिज” उत्सव साजरा करण्यात येतो. लग्न झालेल्या मुलींना दुःख होई. या दुःखाचा विसर पडावा म्हणून “तिज” उत्सव साजरा करीत.
तीज उत्सव हा प्रामुख्याने तांडयातील मुलींचा मानला जातो. या उत्सवात स्त्रिया नाचगाण्यात भाग घेतात. असे असले तरी लग्नास योग्य किंवा उपवर मुलींचा गट या उत्सवाप्रसंगी प्रभावी ठरतो. श्रावण महिना लागताच बंजारा तरुणी रानोमाळ विविध लोकगीते गायला सुरुवात करतात. मनातला आनंद व्यक्त करण्यासाठी उत्साहाने सतत गायिल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे तांडया-तांडयांत वेगळे वातावरण निर्माण होते. नाचगाणे हा बंजारा स्त्रियांचा जीवनधर्म आहे. तीज उत्सव हा अविवाहित मुलींचा सर्वांत प्रिय उत्सव आहे.
आदिवासी समाजात असे दिसून येते की, कोणताही उत्सव आपल्या समूहाच्या प्रमुख नायकाच्या परवानगीशिवाय साजरा केला जात नाही. बंजारा समाजातील अविवाहित मुलींचा समूह नायकाच्या घरी जमा होतो. नायका समोर तीज उत्सव साजरा करण्याविषयी प्रस्ताव मांडतात, लाडीगोडी लावतात. गीत गात नाचतात. मुलींचे म्हणणे ऐकून घेतल्यावर नायक तत्कालीन परिस्थितीचा विचार करतो. तांडयातील रोगराईची माहिती मिळवतो. तसेच कारभारी आणि तांडयातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्लाही घेतो. सल्लामसलत -ााल्यानंतर तांडा नायक तीज उत्सवाला तांडयाचा नायक या नात्याने मंजुरी देतो.
तीज उत्सवाला नायकाने परवानगी दिल्यानंतर तरुणींच्या मनातला आनंद व्दिगगुणित होतो. नाचगाण्याचे फेर धरत नृत्याला रंग चढत असताना तांडयातील स्त्रिया अविवाहित मुलींना पुढे करुन तीजनृत्यात सामील होऊन नाचगाण्याला सुरुवात करतात. त्यासुध्दा मागे राहत नाहीत. अविरत नृत्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यातील अंधाऱ्या रात्री तांडा गीत-नृत्याच्या तालासुराने गजबजून जातो.

“तीज” उत्सव साजरा करण्याची परंपरा राजस्थानी, मारवाडी, गुजराथी इत्यादी जातीजमातींत मोठया प्रमाणात असली तरी बंजारा समाज तीज उत्सव आपल्या पध्दतीने साजरा करतात.
तीज उत्सव साजरा करण्याचा दिवस नायकाने निश्चित केल्यानंतर श्रावण महिन्यातील नायकाने ठरविलेल्या दिवसापासून नऊ किंवा अकरा दिवसांत साजरा करायचा असतो. त्यामुळे तिजेच्या संबंधित आवश्यक असणाऱ्या वस्तूंची जमवाजमव केली जाते. सर्वप्रथम अविवाहित मुलीसाठी गहू पेरण्यासाठी बंाबूची दुरडी आणली जाते. जर घरात अविवाहित मुलगी नसेल तर नातेवाईकांच्या मुलीसाठी दुरडी आणली जाते आणि तशी सूचनाही दिली जाते. दुरडी आणल्यानंतर त्या दुरडीला लोकरीच्या धाग्यांचे गोंडे तयार करुन सुशोभित केली जाते.

तीज पेरण्याच्या ठरलेल्या आदल्या दिवशी सायंकाळी तांडयातील सर्व मुली एकत्र जमतात आणि नृत्य करीत नायकाच्या घरी जातात. नायकाची बायको गहू पाण्यात भिजू घालताना मुलींसोबत नृत्य करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीज पेरायची असते. तेव्हा शिवारातील वारुळमाती आणण्यासाठी जातात. जाताना अनेक गीते गातात. वारुळाची माती बहुतेक बोराच्या झाडाखाली तयार होते. या मातीने गव्हाचे रोपटे वेगाने वाढते. ही माती जमा करण्यापूर्वी मुली हरभऱ्याचे भिजवलेले दाणे बोरीच्या काटयात खोवतात आणि झाडाला प्रदक्षिणा घालतात याला “बोर झुडेर” असा शब्दप्रयोग बंजारा बोलीभाषेत आहे. या प्रसंगी पारंपारिक गीते गातात.
या माती आणण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पुढेपुढे मुलांचाही एक गट असतो. मुलेही मुलींसोबत स्पर्धा करतात. मुलींना गूढ कोडयात अडकवतात. ज्या मुलींचा विवाह पुढच्या वर्षी होणार आहे, अशा मुली तीज पेरल्यानंतर तांडा सोडून जातील म्हणून त्यांना अधिक मान असतो. मुले मुलींच्या रस्त्यात आडकाठी आणतात. मुली बोराच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालतात. म्हणून मुलींचा पहिला नवरा बोरांचे झाड म्हणून चिडवितात. या वेळी लोक तरुण मुलांना पाठिंबा देतात आणि मुले मुलींना पारंपारिक कोडयात अडकवतात. ते कोडे खालील प्रमाणे :-
मुलगा (कोडे):- “वाट बांधू घाट बांधू बांदी चारी देसा, पगे पगेमा
दामळीं बांधू जाईस कुळंसे देसा?”
भावार्थः- मी तुझी वाट बांधली, घाट बांधली,चार दिशाही बांधल्या.
एवढेच नाही तर तुझे पायही बांधले. मग तू कोणत्या
दिशेला जाशील?
मुलगीः- “घाट छोडू, वाट छोडू, छोडू चारी देसा
झारी सदा बेडलो छोडू, जाऊ बापुरे देसा”
भावार्थः- तू बांधलेली वाट, घाट, चार दिशा मी सोडवते. पाण्याचे
भांडयावर भांडे असलेले (कळशी,घागर) झारी सोडवून
मी मा-या बापाच्या देशाला जाते.
अशा प्रकारे मुले मुलींना आणखी गूढ कोडयात
अडकविण्याचा प्रयत्न करतात.
मुलगा (कोडे):- “छो हातेर दोल्डी ये बार हातेर आगेल्डी
ये वातेर आरत केद पच पेरे दियू ओल्डी”
भावार्थः- सहा हातांची दोल्डी (दुरडी) बारा हातांची आगेल्डी
म्हणजे काय? या गोष्टीचे उत्तर दिल्यावरच मी तुला
दुरडीत तीज (गहू) पेरु देईन.
अशा कोडयाचे उत्तर मुली काव्यरुपाने सोडवितात. जर कोडयाचे उत्तर सांगता आले नाही तर मुली गाण्यातून मुलांना विनवणी करतात. त्या मुली मुलांच्या संमती शिवाय मुली पुढे जावु शकत नाहीत. कोडे सोडवले नाही तर
-ााडासाठी आणलेले पाणी सर्व मुलींना सांडावे लागते परत पाणी भरुन आणवे लागते त्यानंतर खऱ्या तीज उत्सवाला प्रारंभ होतो. माती घेऊन आलेल्या मुली नायकाच्या घरी येतात. माती आपल्या दुरडीत टाकून नायकाच्या बायकोने भिजू घातलेले गहू पेरतात. या बरोबर पळसाच्या पानांचे द्रोण करुन त्यात माती भरुन त्यातही गहू पेरतात. या प्रसंगी नायकाच्या घरासमोर नाचगाणे होते. या तीज उत्सवाप्रसंगी ज्या कुटुंबात मुलगी नसते त्या कुटुंबात उत्सवाकरिता जवळच्या नातेवाईकांची मुलगी आणली जाते. तिची दुरडी पेरतात. तील पेरल्यानंतर मुली उत्साही होतात. गाणे म्हणायला सुरुवात होते. रात्रभर नृत्य करुनही मुलींना थकवा जाणवत नाही.
त्या नंतर तीज पेरलेल्या दुरडीमधील रोपांसाठी सकाळी व संध्याकाळी नियमितपणे पाणी शिंपडतात. हे त्यांचे नित्यकर्म होऊन जाते. पाणी आणण्यासाठी मुलींच्या झुंडी नदी, नाला किंवा विहिरीवर जातात. जाता-येताना गाणी गातात. यावेळी मुले मुलींची वाट अडवतात. मुला-मुलींमध्ये सवाल-जवाब होतो. याचा आनंद तांडयातील लोक घेतात. ते काही सवाल-जबाब पुढीलप्रमाणे.
मुलगा (सवाल):-“काळो कुंडो कचन भरो हेल्दा रुंदी वाट, कुंवारी छोरी
कुकर पकडू तारो हात”
भावार्थः- पाण्याचा काळा डोह भरुन वाहातो आहे. पाणी भरण्याची
वाट अरुंद आहे. तू विवाहित (कुंवारी) आहेस, तुझा हात
कसा धरु सांग?
मुलगी(जबाब):- “हास घालू हासली, खेचन बांधू आटी भरे सभामां लाथ
मारु, म जातेरी बेटी”
भावार्थः- मी गळयात हासली (गळयात अलंकार) घातली आहे.
डोक्यावर आटी (दागिना) मजबूत बांधीन, भरलेल्या सभेत
लाथ मारीन, मी खानदानी जातीची मुलगी आहे.
तू माझा हात कसा धरतोस?
मुलगा (सवाल):- “डगमग डागळो गोरी राके खेत
मुठीभर हुल्डा दये तारो घणोच पाकीये खेत.”
भावार्थः- शेतातला राखण करावयाचा मांडव डगमग करतो आहे.
तू शेताची राखण करतेस, तू मला मूठभर हुरडा दे!
हुरडा दिला तर तु-या जीवनाचे शेत भरुन येईल, भरपूर
पीक होईल.
मुलगी(जबाब):- “काचो सरा कचकच लागे, नख लागे जीव जाय
घरदणी कोनी खादो, परदेशी कुं खाय”
भावार्थः- कणीस कच्चे आहे. हुरडा भरलेला नाही. नाजूक आहे.
नख लागले तर जीव जाईल, घरधन्यानेच खाल्ला नाही
तर परदेशी कसा खाईल?
अशा प्रकारे मुली पाणी आणताना सवाल-जबाब करतातःगाणे म्हणतात आणि दुरडीत पेरलेल्या “तीज” ला सामूहिकपणे पाणी घालताना गाणे म्हणतात. ही तीज (पेरलेली दुरडी) पवित्र ठिकाणी ठेवल्या जाते. तिचा सांभाळही केला जातो.
बंजारा समाजात असा लोकविश्वास आहे की, जेवढया जोमाने रोपटयाची वाढ होते, तवढयाच जोमाने तांडयाची भरभराट होते, समृध्दी नांदते. म्हणून अविवाहित मुली “तिज”चा सांभाळ करीत असतात. कोणत्याही परिस्थितीत त्या रोपटयावर विघ्न येऊ देत नाहीत. हा मुलींच्या प्रतिष्ठेचा विषय असतो. मुली तीजचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून त्यांच्याविषयी गीतातून मनःकामना व्यक्त करतात.
या उत्सवाच्या कालावधीत उंच उंच झोपाळे बांधून, झोपाळयावर अनेक धार्मिक कथा-गीते गायिली जातात. मग रात्रंदिवस नृत्यगायनाला रंग चढतो. तीज विसर्जनारच्या अगोदरच्या दिवशी “ढंबोळी”चा कार्यक्रम असतो. या दिवशी सर्वांनी गोडधोड करुन “तिज”ला नैवेद्य दाखवून पूजा करायची असते. ढंबोळी हा गव्हाच्या पिठापासून तयार केलेला मुटकुळयासारखा पदार्थ “तिज”ला अर्पण करतात. तसेच या दिवशी मुली उपवास करतात आणि आपल्या बाहेरगावच्या मैत्रिणींना बोलावून जेवण देतात.
त्यानंतर सायंकाळी सर्व मुली एकत्र जमतात आणि चिखलाच्या दोन मूर्ती तयार करतात. याला “गणगोर” असे म्हणतात. मोठी मूर्ती महादेवाची असते, तर लहान मूर्ती पार्वतीची असते. या गणगोरींची स्थापना करुन मुली त्यांची मनोभावे नारळ फोडून, गुळाचा प्रसाद दाखवून पूजा करतात आणि हा नारळ व गुळाचा प्रसाद मुली घरोघरी वाटतात. यालाच “ढंबोळी” असे म्हणतात.
रात्री आपसांतील लोकांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. घरातील सर्व मंडळी जेवणापूर्वी तिजेला नमस्कार करतात. आमंत्रित असलेली व्यक्ती तिजेला पैसे व मुलीला शक्य असल्यास कपडे आहेर करते. मुली जेवणानंतर गणगोरजवळ नृत्याचा फेर धरतात, गातात.
या प्रसंगी तांडयातील नायक प्रमुख मुलाची निवड करतो. तसेच मुलींमधून एका मुलीची निवड केली जाते. यात प्रमुख मुलाच्या गटातील एक सवंगडी एका हातात गवताचा “दोना” (द्रोण) घेऊन मुलींच्या मध्यभागी उभा होतो व हा गवताचा “दोना” मुलींनी मिळवायचा असतो. मुली त्याच्याभोवती फेर धरुन नाचतात, गातात. मुलेही मुलींना गाण्यातून चिडवतात. शेवटी मुली गोंधळ घालून “दोना” हस्तगत करतात. तसेच शेवटी एक तरुण पाटी घेऊन उभा राहतो. ही पाटीही मुलींना हस्तगत करावयाची असते. रात्रभर मुले-मुली (खेळून) थकून जातात आणि ही पाटी हस्तगत करतात. या पाटीला “पिडीया” असे म्हणतात. अशा प्रकारे नृत्य-गायन, खेळात दिवस उजाडण्याची वेळ येऊन ठेपते. तो दिवस म्हणजे तीज विसर्जनाचा दिवस असतो.
या दिवशी मुली आपापल्या तिजेची दुरडी घेऊन घरोघरी फिरतात नृत्य करतात. शेवटी संपूर्ण तांडा नायकाच्या घरासमोर जमा होतो. त्या नंतर सर्वात मोठी असलेली मुलगी आपल्या तिजेची दुरडी नायकासमोर ठेवते. नायक त्या तिजेच्या दुरडीला नमस्कार करतो. एक-दोन रुपये आहेर ठेवतो आणि भारावलेल्या मनाने “आवो तीज तोडा” “या तीज (गहू) खुडू” असे म्हणतो. नायक तीज तोडून इतरांना भेट देतो व आपल्या पगडीमध्ये तिजेचा (गहूचा)तुरा खोवतो. त्यानंतर सर्वांना तीज तोडायला अनुमती मिळते.सर्व मुली आपआपली तिज खुडतात आणि इतरांना भेट म्हणून देतात. ती तिज कोणी आपल्या गळयात, कोणी आपल्या हातात बांधतात.त्यानंतर तीज विसर्जनासाठी तांडयातील लोक नदीकडे निघतात, तेव्हा मुली (तीज) आपली मैत्रीण चालली म्हणून रडतात व तिला निरोप देताना गाणी गातात.
या प्रमाणे भरावलेल्या मनाने तांडयातील सर्व लोक नदीवर येतात. “तीज” ची दुरडी आणि “गणगोर” यांना नदीच्या प्रवाहात विसर्जित करतात. मुली मोठमोठयाने रडतात. स्त्रिया आपल्या ओढणीचा पदर हातात घेऊन पदराने निरोप देतात. तीज नदीच्या प्रवाहात दूरदूर जात असते. त्या प्रसंगी निरोप देतांना
वेती जा ये वेती जा ।
जा मारी सातण वेता जा ।।
झाडीन देखन याढी केस ।
दातण देखण सातण जा।।
वेती जा मारी सातण वेती जा ।
अशी प्रकाचरे गीत म्हटले जाते. अशा प्रकारे तीजोत्सवाचा शेवट केला जातो.हा लेख लिहतांना प्रा. सुनिल राठोड सर, दर्यापुर अमरावती यांच्या पुस्तकाचा मला भरपुर आधार मिळाला आहे.
डॉ.एम.बी.


Banjara News app download Now... 
Click here. .. 



बंजारा तीज स्पेशल गीत....

Share:

//BANJARA NEWS//‘सुधाकररावांच्या कार्याचा राज्यकर्त्यांना विसर’


सुधाकररावांच्या कार्याचा राज्यकर्त्यांना विसर’
जलसंधारण क्षेत्रात माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राज्यात भरपूर कामे केल्यानंतरही राज्यकर्त्यांना त्यांच्या कार्याचा विसर पडला आहे. संत सेवालाल महाराज यांचा संदेश आणि सुधाकरराव नाईक यांचे जलसंधारणाचे कार्य पुढे नेले असते तर आज जलक्रांती प्रयोग राज्यात नव्हे तर देशात चर्चिला गेला असता, असा विश्वास आमदार मनोहरराव नाईक यांनी व्यक्त केला आहे.

पोहरादेवी येथे सेवालाल युनिटच्या उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. आमदार नाईक म्हणाले, जलसंधारण मंडळाचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री असताना सुधाकरराव नाईक यांनी ‘सर्वप्रथम वाहते पाणी चालवायला शिका, चाललेले पाणी थांबावयाला शिका आणि थांबलेले पाणी जिरवा’ असे सांगितले होते. यासाठी त्यांनी विशेष तरतूद केली होती. जलसंधारणाची ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सारखी कामे हाती घेणारे महाराष्ट्र त्यावेळेस देशातील एकमेव राज्य होते. उद्याच्या पाणीटंचाईची बाब सुधाकररावांनी फार पूर्वीच ओळखली होती. त्यांनी त्या क्षेत्रात कार्यही केले. पण, त्यांचे कार्य राज्यकर्त्यांनी पुढे नेले नाही. त्यामुळे वसंतराव नाईकांनी कृषिक्रांती आणली तशी जलक्रांती राज्यात येऊ शकली नाही. त्याचे परिणाम आज महाराष्ट्रासह संपूर्ण देश भोगत आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात पाण्याचा दुष्काळ आहे. तर देशभरातील सात राज्ये दुष्काळाच्या झळा सोसत आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमत्री चंद्राबाबू नायडू यांनी नदीतील वाळू मोफत नेण्याच्यादृष्टीने निर्णय घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत वाळू आणि गाळाचा उपसा नदीमधून होणार नाही तोपर्यंत नदीचे पात्र खोल होणार नाही. त्यामध्ये पाणी खेळणार नाही. जलसंधारणाची कामे करीत असतानाच राज्य सरकारने तातडीने मोफत वाळू देण्याचा निर्णय जाहीर केल्यास पुन्हा एकदा महाराष्ट्र पाणीदार बनेल, असेही नाईक म्हणाले.

यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पवार यांनी तर आभार शंकर आडे यांनी मानले.

BTV BANJARA NEWS APP आत्ताच Download kra ...
Click here. ...



BANJARA UNLIMITED STATUS VIDEO AND SONGS. ..

BTV Banjara youtube channel 



Share:

Wednesday, 8 August 2018

गोर भाई भेनेन जाहिर आव्हान आपन संस्कृति बचाडेरो अब आपने हाथे माई छ||गोर नरेश भाऊ राठोड़ (गोर धर्म प्रचारक मुंबई)


       जय गोर धर्म
  🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
  *ग्रुपे माई उपस्थित  से नायक कारभारी अनेक संघटना , राजकीय पक्ष माई काम कररे जकोण मार गोर भाई ,मित्रेन नम्र विनंती छ की 5 मिनट काडन समाजेर हिते माई  पोस्ट जरूर  वाचो व पसंद आई तो आंग शेयर करो 🙏🏼*


        *गोर धर्मेर आत्मचिंतन व प्रसार प्रचार करेर  गरज का छ......??????*

*कोई बंजारा केरे, कोई गोरमाटी,कोई लमानी....कोई लंबाडा हनु अनेक नामे ती आपन गोर बंजारा समाज बिखर मेलोच......*

         *आपन गोर धाटी, गोर संस्कृति, बोली–भाषा, रहन सहन अब अंधारे माई जारोच खुप काई लोग घरेम छचापरेती *कर्नाटका माई कनाडा, महाराष्ट्र माई मराठी, तेलंगाना माई तेलगु* *हनू प्रकार अनेक *भाषा माई घरेम बोल रेच घरेमा गोर बोली भाषा माई बोलरेे कोनी जेती आपन आयवाल *पीढ़ीन गोर संस्कृति काई छ आपन दवाली री गीत, ढावलो, होळी री लेंगी, आपनो डपडा ,नृत्य,आपन सांस्कृतिक  पेहराव,आपन गोर संस्कृति* *येर बद्दल आपन कळारे कोनी अगर हनुज रो तो भियाओ आय वाल भविष्य माई आपन गोर बंजारा समाजेरो अस्तित्व खत्म वे जाय....!*

     👉  *हर वर्ष लाखो गोर बंजारा भाई भेन आचे अाचे सीखे साखे लोग धर्म परिवर्तन कर रेच कोई ख्रिश्चन माई जारे, कोई मुस्लिम माई, पंजाब माई सिख धर्म  माई जारे यि आपने सारू खुप विचार करेर वात छ।* 

   *घरे घरे माई संघटना वेरिच घरे घरे माई नेता वेगे भियाओ   आपन तांडेर नायक–नायकनेरो मान कत छ, कारभारी, डाव – सान, हसाबी नसाबी, कत गे से...*

            *आव भियाओ अब एक गोर धर्म🏳️ धोळो धजा हेट आमा*

             *गोर छा गोर करीया.. मुवीमलक सरजीत करिया....गोरमाटीरो राज लाया सेवालाल बापु तारो बोल खरो करिया*
     
☝️  *काही  महत्वपूर्ण  मुद्दा ध्यान दे सरिक........*

*१)गोरुर दवाळी पद्धत वेगला कोरुर दवाळी पद्धत वेगला.*

*२)आपन होळी वेगला कोरुर  होळी वेगला.*

३) *आपनों समाज रोतो –रोतो गाय वालो गातो –गातो रोये वालो समाज छ*

*४) धर्म वे सारू काई लगाच = बोली भाषा +संस्कृति+रहन सहन+ओडाव पेराव+खान पान* *ये से वाते रेन चाय*

      *तो भियाओ आपन गोर धर्म का वे सकेनी आपनो सेज वेगळा  छ जो एक धर्मेम चावच तो आपन धर्म भी गोर छ दुसरो धर्म कु वे सकच आपणो  विचार करो .....??*

*आपण गोर माटी छा ,आपणो धर्म भी गोर छ, गोर धर्म*

*सिख धर्म,मुस्लिम धर्म खिश्च़न  धर्म वोर सोबतज *१२कोटि गोर बंजारा समाजेरो गोर धर्म छ..*

       *जागो भियाओ अब भी आजी वेळ गी कोणी , उटो जागो आपन गोर धर्म आपन समाजे सारू काम करो ,आपण धर्में जिवंत रखाडो, गोर धर्मरो प्रचार प्रसार करो .... आपन हक्क मागन  कोनी खोसन लो .....*

            *आपने तांडेम गोर धर्मरो बोर्ड लगाव आपन नायकेरो,कारभरीरो,डाव–सानेरोे ,गोर धर्म रक्षक, प्रचारकेरो नाम लिखो बोर्ड अनावरण करो , आपण तांडेर मान-सन्मान रखाडो...🙏🏼*

          *गोर धर्म आपन धाटी,संस्कती, आपन तांडेर परंपरा जतन करो *म से मार गोर भाई भेनेन जाहिर आव्हान करुचू की आपन संस्कृति बचाडेरो अब आपने हाथे माई छ आपन गोर संस्कृति (कसलात, ढावलो, आपनो नृत्य,  सीखो, घरेम गोर बोली भाषा बोलो हीच विनती करुचू...*
             
    *तमार काही प्रश्न र तो जरूर विचारो आपणेन सेन सोबत रेन गोर धर्मेर प्रचार प्रसार करेर छ*


*🌹जय गोर🌹*
*🌹जय गोर धर्म🌹*

 *गोर नरेश रामू राठोड*
     *चेंबूर,मुंबई*
*(गोर धर्म प्रचारक)*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Share:

Tuesday, 3 July 2018

BANJARA NEWS//राष्ट्रीय बंजारा टायगर्स च्या वतीने मोहोने-आंबिवली(कल्याण) येथे वसंतरावजी नाईक यांच्या १०५'व्या जयंतीनिमीत्त "बंजारा समाजरत्न पुरस्कार आणि विद्यार्थी गुणगौरव" समारंभ संपन्न.*



वार्ताहर(प्रतिनीधी)- *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,बंजारा रत्न,महानायक-कै.वसंतरावजी नाईक यांची १०५'वी जयंती "मोहने-आंबिवली(कल्याण)" येथे अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.*
     *यानिमीत्त बंजारा समाजातील इ.१०'वी./ १२'वी./ पदवीधर,सेवानिवृत्त कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.तसेच,समाजातील विविध क्षेत्रामधे कार्य करणाऱ्या 'समाजसेवक' यांचा "बंजारा समाजरत्न-2108." हा पूरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण पश्चिम येथील कार्यसम्राट आमदार-नरेंद्रजी पवार यांच्याहस्ते झाले.तर, अध्यक्ष-मा.मदनभाऊ जाधव(राष्ट्रीय उपाध्यक्ष-RBT) हे होते.प्रमुख पाहुणे-मा.आत्मारामभाऊ जाधव(राष्ट्रीय अध्यक्ष-RBT),मामा.अनिलभाऊ पवार(राष्ट्रीय सरचिटणीस-RBT),मा.अशोकभाऊ चव्हाण(प्रदेशाध्यक्ष-RBT),मा.भारतभाऊ राठोड(प्रदेशाध्यक्ष-RBVT),मा.भिमराव राठोड(नायक-कल्याण),मा.सुरेश पवार(RBT सचिव-मुंबई विभाग), मा.सौ.सुनंदाताई कोट(नगरसेविका-मोहोने),सौ.सुनिता(समाजसेविका),मा.चतरसिंग राठोडसर(समाजसेवक-जामनेर),मा.रमेश पवार(विस्तार अधिकारी-टिटवाळा),मा.अनिलभाऊ चव्हाण(RBT-ठाणे जिल्हाध्यक्ष),इ.उपस्थित होते.*
      *यावेळी सर्वप्रथम नाईकसाहेब व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यानंतर, समाजातील इ.१०'वी/१२'वी/पदवीधर तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येऊन-मा.मोरसिंगभाऊ राठोड(दलितमित्र तथा समाजसेवक,जामनेर),मा.सौ.कविता राठोड(सरपंच-पिंपळगांव कमानी,ता.जामनेर),मा.डॉ.कैलास पवार(सिव्हील सर्जन-ठाणे,मा.डॉ.गणेश राठोड(समाजसेवक-अंबरनाथ),मा.डॉ.सुदर्शन राठोड(सहा.पोलिस आयुक्त),मा.विजयजी राठोड(ॲनिमेशन डायरेक्टर,मुंबई),मा.आशिष राठोड(आरोग्यमित्र-जे.जे.हॉस्पिटल),मा.गोविंद राठोड-मुख्य संपादक-बंजारा लाईव्ह चॕनेला),मा.सतिष राठोड(पत्रकार तथा समाजसेवक,कल्याण),मा.अमरसिंग राठोड(समाजसेवक,बदलापूर),मा.धर्मा राठोड(लेखक तथा समाजसेवक-टिटवाळा),मा.दिनेश पवार(उप्पलखेडा,ता.सोयगांव),मा.देविदास राठोड(अपंग मित्र तथा समाजसेवक,बोईसर),मा.प्रा.संतोष राठोड(कवी तथा लेखक),मा.सौ.आश्विनीताई राठोड(समाजसेविका-सोलापूर),इ. समाजसेवक यांचा "बंजारा समाजरत्न-2018." या पुरस्काराने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.*
      *या कार्यक्रमाचे उद्घाटकःआमदार-नरेंद्रजी पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की," नॉन-क्रिमीलेअर" चा प्रश्न मी स्वतः येत्या अधिवेशनामधे मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करेन आणि "मोहने-आंबिवली येथील संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवी मंदिर" चा प्रश्न तात्काळ सोडविण्यात येईल आणि या मंदिराच्या निर्माणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करुन देईल.आणि समाजातील सर्व समाजबांवांना वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न करीन.*

     *यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,दलितमित्र-मोरसिंगभाऊ राठोड,यांनी देखील मनोगत व्यक्त केले.शेवटी, कार्यक्रमाचे अध्यक्ष-मदनभाऊ जाधव(राष्ट्रीय उपाध्यक्ष-RBT) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधे समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजाच्या ज्या अडी-अडचणी असतील त्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन आणि यावर्षी कल्याण येथे बंजारा समाजाचा लोकप्रिय सण- "तिज उत्सव" अतिशय उत्साहात साजरा करण्यात येईल असे जाहीर केले.*
       *कार्यक्रम यशस्वीतेसाठी-अशोक राठोड(RBT-तालुकाध्यक्ष),केवलसिंग तंवर(RBT-तालुका सचिव),अजमल जाधव(RBT-तालुका सरचिटणीस),गोकुळ राठोड(अटाळी-शहराध्यक्ष),गबरु राठोड(शहर उपाध्यक्ष),राम राठोड(मोहने शहराध्यक्ष),ज्ञानेश्वर राठोड(कल्याण शहराध्यक्ष),विजय राठोड,अरुण चव्हाण,अंबर चव्हाण,कांतीलाल राठोड,देवचंद चव्हाण,विष्णू पवार,सोमनाथ चव्हाण,सोन्या पवार,विलास राठोड,शिवाजी राठोड,बाळू पवार,अज्ञान राठोड,पवन राठोड,प्रदिप राठोड,सौ.अनुसया चव्हाण,सविता पवार,मा.अनिता चव्हाण(RBT-नवीमुंबई अध्यक्षा)यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन-मा.गजानन जाधव(RBT-जिल्हा उपाध्यक्ष),यांनी केले तर,आभार-मा.भास्कर आडे यांनी मानले.*
-----------------
*प्रति,*
*मा.संपादक सो;*
*दैनिक............*
*यांचे सेवेशी.*
         *विषय-ःवरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामधे प्रसिद्धीस द्यावी ही विनंती.*
🙏आपला🙏
*मा.शंकर पवार*
*(प्रसिद्धी प्रमुख)*
*राष्ट्रीय बंजारा टायगर्स*
*ठाणे जिल्हा.*

🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Share:

BANJARA NEWS//अखिल भारतीय बंजारा सेना उल्हासनगर तर्फे स्व वसंतरावजी नाईक जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित

*अखिल भारतीय बंजारा सेना उल्हासनगर तर्फे स्व वसंतरावजी नाईक जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित

महाराष्‍ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे,  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,बंजारा रत्न, *कै.वसंतरावजी नाईक* यांची *१०५ वी जयंती महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर दि. १ जुलै २०१८ रोजी *उल्हासनगर* येथे पार पडले आपल्या लाडक्या महानायकास अभिवादन करण्या साठी शेकडो बंजारा समाज उपस्थित होता
सर्वप्रथम संत श्री सेवालाल महाराज व स्व. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या कार्यक्रमाचे*उद्घाटक:- मा.सौ. चंद्रकला ताई जाधव* (मुंबई प्रदेश अध्यक्षा बंजारा महिला सेना)
अध्यक्ष:- मा.श्री. विजयजी राठोड* (अॅनिमेशन डायरेक्टर मुंबई)
मा.श्री.ईश्वर जाधव* (सामाजिक कार्यकर्ते मुंबई)
मा.श्री.भिमराव राठोड* (नायक कल्याण शहर)
मा.सौ. सुनीता राठोड* (समाजसेविका कल्याण)
मा.सौ. मानसी ताई चव्हाण* (समाजसेविका बदलापूर)
मा.श्री. करसन भाऊ राठोड* (राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा युवा सेना)
मा.श्री.दिलीप राठोड* (राष्ट्रीय महासचिव बंजारा युवा सेना) यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमा साठी अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे कार्यकर्ते
मा.पृथ्वीराज चव्हाण नवी मुंबई अध्यक्ष, मा.विलास जाधव कल्याण तालुका अध्यक्ष, मा.जगदीश जाधव कल्याण ता.उपाध्यक्ष, मा.विनोद जाधव कल्याण ता. सचिव, मा.विलास राठोड कल्याण शहर अध्यक्ष, मा.अक्षय जाधव बदलापूर शहर अध्यक्ष, मा.चंद्रकांत राठोड बदलापूर शहर उपाध्यक्ष, मा.अनिल राठोड आंबिवली शहर अध्यक्ष, मा.अबरसिग राठोड डोंबिवली शहर अध्यक्ष मा.खुशाल चव्हाण  डोंबिवली उपाध्यक्ष मा.वासुदेव जाधव डोंबिवली शहर सचिव उपस्थित होत
  दिनांक1 जुलै 2018 रविवारी
*दुपारी 2.00 वाजता ठिकाण पूज पंचायत हॉल, साईबाबा मंदिर समोर स्टेशन रोड, सेंक्शन उल्हासनगर-4 येते कार्यक्रम पार पडला
आयोजक व सूत्रसंचालन
मा.आकाश जाधव,अखिल भारतीय बंजारा युवा सेना, अंबरनाथ.यांनी केले व आभार प्रदर्शन मा.श्री.करसनभाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा युवा सेना यांनी केले

Share:

Saturday, 30 June 2018

वसंतराव नाईक साहेब जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..--(गोर विकास चव्हाण)

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जीवनयात्रा
1 जुलै 1913 : यवतमाळ जिल्हातील पुसद तालुक्यातील गहुली येथे बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात जन्म.
1933 : नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
1937 : मॉरिस कॉलेज, नागपूर (सध्याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्था) येथून बी.ए. पदवी परीक्षा उत्तीर्ण.
1940 : नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी उत्तीर्ण.
1941 : प्रारंभी अमरावतीचे प्रख्यात वकील कै. बॅ. पंजाबराव देशमुख हयांच्या बरोबर व नंतर पुसद येथे स्वतंत्रपणे वकिली व्यवसायास प्रारंभ.
पुसद तालुक्यातील आदर्श ग्राम चळवळीत पुढाकार.
त्यांच्या प्रयत्नांमुळे व तळमळीमुळे त्यांचे स्वत:चे गाव ‘गहुली’ हे
आदर्श गाव बनले.
6 जुलै 1941 : प्रतिष्ठित ब्राम्हण घराण्यातील कु. वत्सला घाटे यांच्याशी विवाह केला. हा विवाह आंतरजातीय असल्यामुळे त्यांच्या बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली. काही दिवस त्यांना वाळीत देखील टाकण्यात आले.
1946 : पुसद नगरपालिकेच अध्यक्ष म्हणून निवड. जुन्या मध्यप्रदेश राज्यात उपमंत्री म्हणून 1952 मध्ये नियुत्की होईपर्यत याच पदावर होते. हया अवधीत सुधारणाविषयक अनेक कामे केली.
1950 : पुसद हरिजन मोफत वसतिगृहाचे व दिग्रस राष्ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्यक्ष.
1951 : विदर्भ प्रदेश कॉंग्रेस समितीचे व कार्यकारिणीचे सदस्य.
1952 : पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नियुक्ती.
हयाच काळात मध्यप्रदेश गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्षपद भूषविले.
मध्यप्रदेश भू-सुधार समितीचे उपाध्यक्ष व मध्यप्रदेश सरकारच्या मेट्रिक समितीचे अध्यक्ष होते.
1956 : राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या मुंबई राज्यात सहकार, कृषी, दुगधव्यवसाय या खात्यांचे मंत्री म्हणून नियुक्ती.
अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्ट्र विभागीय कॉंग्रेस समितीचे व तिच्या कार्यकारिणीचे तेव्हापासून सदस्य.
1957 : सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेत पुसद मतदारसंघातून दुस-यांदा निवड झाली. महाराष्ट्र मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून नियुक्ती.
इंडिया कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल फायनान्स सोसायटीचे सभासद म्हणून निवड.
1958 : जपानला गेलेल्या आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात समावेश व जपानला भेट, टोकीयो येथे एफ.ए.ओ.च्याबैठकांना हजर.
1959 : पुसद येथे ‘फुलसिंग नाईक कॉलेज’ ची स्थापना. चिनी सरकारच्या शेतकी संघटनेच्या निमंत्रणावरुन चीनला भेट.
1960 : महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून नियुक्ती. हया वेळी शासनाने महत्वपूर्ण असा कमाल जमीनधारणा क्षेत्रासंबंधीच
ा कायदा संमत केला.
आपल्या मंत्रीपदाच्या कारकीर्दित त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले व महाराष्ट्रात पंचायती राज्याची मुहूर्तमेढ रोवली.
1962 : सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर यवतमाळ जिल्हातील पुसद मतदारसंघातून तिस-यांदा निवड होऊन पुन्हा महसूल मंत्री म्हणून नियुक्ती आणि मुख्यमंत्री होईपर्यत हेच खाते त्यांच्याकडे राहिले.
5 डिसेंबर 1963 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
1964 : युगोस्लाव्हियाचा दौरा.
1965 :1 मे 1965 रोजी आंतर भारती, मुंबई (इंडियन अॅकॅडमी ऑफ लेटर्स) संस्थेचे उद्घाटन.
भारत-पाक संघर्ष सुरु होताच 9 ते 11 सप्टेंबरला मुंबईत स्फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्यामुळे महाराष्ट्रात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले. नंतर काही महिने युध्दसज्जतेसाठी महाराष्ट्राचा दौरा केला.
शेती उत्पादनाच्या नव्या कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्हांचा दौरा.
1966 : अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेलया शेतक-यांना हिंमत देण्यासाठी राज्यातील दुष्काळी जिल्हयांत झंझावती दौरा.
1967 : सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभावी प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्यांदा निवड होऊन 6 मार्च 1967 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दुस-यांदा एकमताने निवड.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र विधानसभेत भाषण (17-11-1967)
1970 : अमेरिकी शासनाच्या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपियदेशांना भेटी.
1972 : सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा. या सार्वत्रिक निवडणुकीतून पुसद मतदारसंघातून पाचव्यांदा निवड होऊन 14 मार्च 1972 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिस-यांदा निवड झाली.
महाराष्ट्रात गंभीर स्वरुपाचा दुष्कह पडला होता. राज्यातील नऊ जिल्हांतील दुष्काळ हा देशातील इतर कोणत्याही भागातील दुष्काळापेक्षा अधिक तीव्र स्वरुपाचा होता; प्रत्येक जिल्हयात फिरुन त्यांनी दुष्काळी कामाला जोराने चालना दिली.
20 फेब्रु 1975 : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा.
12 मार्च 1977 : वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड
18 ऑगस्ट 1979 : सिंगापुर येथे 66 व्या वर्षी निधन
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*जय सेवालाल जय गोर धर्म जय वसंतराव नाईक साहेब*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Share:

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook