जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Saturday, 23 December 2017

संत सेवालाल महाराजा विषयी जाणून घ्या..क्रांतिकारक महापुरुष

संत सेवालाल
संत सेवालाल क्रातीकारी महापुरूष

गोरा बंजारा जामातीमध्ये संत सेवालाल महाराज नामक मोठा संत होऊन गेला. त्याचा जन्म गोलाल डोडी नामक आंध्र प्रदेशातील एका तांड्यात १५ फेब्रुवारी, १८०६ साली झाला. सर्व अर्थानी समृध्द आणि संपन्न सभ्यता आणि संस्कृति असलेल्या गोरवंषामध्ये सेवाभावाया जन्म झाला. बैलाच्या पाठीवर माल वाहतुक करीत जगभर ही जमात भटकत होती जगातुन कित्येक परंपरा त्यांनी भारतात आणल्या त्याच प्रमाणे भारतातीलजीवन जगण्याचे तत्वज्ञान बंजारा जामतीनी जगाला दिले. त्या परंपरेत सेवाभावाचा जन्म झाला. सेवाभायाचे विचार आजही मौखिक (लोकसाहित्य) तांड्यांच्या कंठात सुरक्षित आहेत. त्याला लीपिबध्द करण्याचा प्रयत्न होत आहे. सेवाभायाचे विचार सेवा भायार बोल गायक लडी गायक काव्य भजनात आजही तांड्यात नगारा, थाळी वाद्यावर भजनकरी गातात. त्या बोल गीतातुन सेवाभायानी जे विचार व्यक्त केलेत ते भारतीया साठीच महत्वाचे नाहीतर जगाला मार्गदर्शन करणारे आहे त्यांचे काही विचार पाहुन आपल्या गोरबोलीमध्ये सेवाभाया म्हणतात शिकवाडी तम सोता तमारे जीवनेम वजालो लगा सको छो | कोइ केन भजो मत पुजो मत, कोई केती कमी छेणी | सोतार वळक सोता करन दिजो | भजनेम वेळ घाले पेक्षा करणी करेर सिको | मारे शिकवाडी प ध्यान दिजो | जाणजो,छाणजो, पचच मानजो | जीवन जगण्याचे सुत्रच आपणाला सेवाभाया संगतात. सर्व प्रथम माणसाचा विश्वास स्वतः वरच असला पाहिजे. त्याशिवाय माणसाला माणुसपण येणार नाही. कोणीतरी येईल आणि आपला उध्दार करेल. (अवतार कल्पना) यावर विसंबुन राहु नये. जो दुस-यावर विश्वासला त्याचा कर्यभाग बुडाला सांवाभाया म्हणतात. तुम्ही स्वतःच प्रकाशमान व्हा (स्वयंदिपभव) तुम्ही स्वंय प्रकाशीत होऊशकता. हे विचार नाहीतर जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे. ज्याचे नाते गौतम बुध्दाच्या शिकवाडी सी. संबंधीत आहे. गौतमबुध्दाच्या विचाराचा मोठा परिणाम सेवाभायाच्या शिकावाडीमध्ये दिसुन येतो.
असी कथा पण आहे की बंजाराना सर्व प्रथम दिक्षा गौतम बुध्दांनी दिली होती. तपसु, भिळु नामक व्यापारी टांड्याचे यांना सर्व प्रथम गौतम बुध्दांनी दिक्षा दिली. बंजारा नायकांनी गौतम बुध्दाला स्वयं दिप भव – गौतम बुध्द म्हणतात. मनुष्य स्वयंही अुसका स्वामी है | भला दुसरा ऊसका स्वामी कैसे हो सकता | मनुष्य अपने आपही भली प्रकारसे लोभदि वृत्तीयोका दमन कर के दुर्लभ स्वामित्व निर्वाण प्राप्त कर सकता (धम्मपद) माणुस सर्व प्रथम माणुस आहे. (वसंतराव नाईक) कोणी, कोणा पेक्षा मोठा नाही. कोणाची व्यक्तीपूजा करू नका. व्यक्ती स्तुती पशंसा करू नका, पुढे म्हणतात. स्वतःची ओळख तुम्ही स्वतःच्या कर्तुत्वाने जगाला करून द्या. त्याच बरोबर देव धरम पूजा अर्जा व्रत उपवास, भजन, किर्तनात वेळ घालवा हे जे मी सांगतो आहे ते अंतिम समजू नका, अनुभव घ्या. मा-या शिकवणीवर एकदम विश्वास ठेवु नका.
हे सत्य लोकांना सांगण्यासाठी एक ताकद लागते ती सेवाभाया कडे होती अतिशय नम्रपणे ते सांगतात छाणजो जाणजो पचच मान जो मा-या शिकवणीवर लक्ष द्या. खरे खेट्याचे परीक्षण करा मग स्वतः समजुन घ्या मगच मा-या विचाराला मान्यता द्या.
मगच बोला तसेच वागा – समजुन उमजून निर्णय स्वतःच्या संत सेवालाल निर्गुन भक्त परंपरेतील संत होऊन गेले. त्यांच्यावर आधारित लोक कथेतुन निर्गुण-सगुण-भक्तीचा वाद दिसुन येतो. संत कबीरांची परंपरा त्यांच्या लोककथेतुन दिसुन येते. मरीया खेलु कोणी धुजूं कोणी त्याकाळी देवी अंगात येते असे भासवुन भक्तांना साधु लुबाडत होते. ते म्हणत मा-या अंगात देवी नाही मी नाचणार नाही कोणापुढे -ाुकणार पन नाही मी एक दुरूस्त इमान असलेला आपल्यातला आपल्या सारखाच माणुस आहे. माणसाची सेवा हिच ईश्वराची सेवा आहे त्या करीता त्यांनी संवादास नामधारण केले. सेवादास माणसाची सेवा करीत गोर गरीबाचे दास ते लाल मोती झाले. मोतीवाला झाले. अहिंसा, शुध्द चरित्र, सत्य, न्या, दया, नम्रमा, भतदया मानवता हे सर्व गुण सेवाभायाच्या जीवनात दिसुन येतात. म्हणून समाजात मोठ्या भावाची भूमिका (भाया) घेऊन तांडा जीवन सुखी समृध्द आणि संपन्न करतात. गोर कोर सर्व जाती धर्माच्या माणसांची सेवा व्रत धारण करुन ब्रम्हचारी जीवन जगुन विचाराची वंशावली त्यांनी निर्माण केली. सेवाभायाची आरदास प्रार्थना निन्ती माध्ये माणसांनी कसा विचार करावा कसे जगावे आणि कोणासाठी जगावे यो सुन्दर पसायदान बहुजन हिताय बहुजन सुखायचे तत्व-ाान सांगते तसेच जीवन कसे जगावे आपल्या इच्छा आकांक्षा कशा असाव्यात, चांगल्याची संगत घडू दे बंजारा सभ्यता आणि संस्कृतिच सेवाभायानी या प्रार्थनेत व्यक्त केली आहे. आताही तांड्यात पूजा अर्चाच्या वेळी सामुदायिक प्रार्थना होते. त्या प्रार्थनेत व्यक्तीगत पूजा अर्चा नसली तरी व्यक्तीगत प्रार्थनेत सामुहिक आराधना असते. – सेन साई वेस मरियमा याडी किडी मुंगीन साई वेस खुटा मुगरीत साई वेस जन जिनगानीर साई वे, बाळळ बच्छान साई वेस याडी वाडी वस्तीन साई वेस – हरो भरो करे याडी सावेकारेर समनक रकाड, कचेरीरे पचेन काढ भलेतीभैट कर, सत्ते काम फत्ते कर याडी काळ मातेर मनक्या छां पगे पगेम चुकाचां – याडी चुकी भुली माफ कर, साबीतेन साई वेसद ….
-जीव जुतु पशु प्राणी जड चेतन वसती वाडी लहान मोठे गोर कोर सर्वांना प्रसन्न हो. कोणाकडून कर्ज घेतले असेल तर कर्ज चुकते झाल्याशिवाय मरण देऊ नको. कोर्ट कचेरीची पाळी येऊदेऊ नको. त्यापासून दुर ठेव चांगल्या माणसाची भेट घडू दे. जे सत्य खरे काम असेल तेच पूर्ण कर. शेवटी माणुस चुकीचा पुतळा आहे. त्या ला क्षमा कर .. जीवनात बेईमानी नसावी आपला इमान दुरूस्ती असली पाहिजे सावकारापासुन दुर न जाणे त्याच बरोबर कोर्ट कचेरी पासुन दुर राहण्याची कल्पना. त्याच बरोबर सर्वांना आशीर्वाद मागतांना जे सत्य काम असेल तेच फत्ते कर चांगल्या कामातच यश हे एक स्वाभिमानी चारित्र्यवान समाज निर्माण करण्याचे स्वप्न सेवा भाया यपाहत होते. सेवा भाया संत साधु महात्माच नव्हते तर ते सामाजिक द्रष्ट्रा पण होते. भविष्यात समाजात काय घडेल याची भविष्यवाणी सेवा भायानी केली होती. ते सेवाभायाचे बोल खरे ठरत आहेत. त्यांच्या वचनाबद्दल वेगळे लिहावे लागेल चांगले काय आणि वाईट काय हे समजुन वागणे जगणे त्या करीत संवाभाया सत्य हाच देव मानतात, आपण जे बोलतो ते सत्यच असले पाहिजे एका देवी संवदात संदर्भ आहे म तारे जिभेपर री युँ | सेवाभायाच्या मुखातुन जे शब्द बाहेर पडतील ते सत्यच असतील तुकाराम मजाराजाप्रमाणे भले तरी देऊ .. तसेच सेवा भाया म्हणतात काठीची प्रसंगी तलवार करीन दगडाला बॉम्ब करीन खरे तर सेवाभायाचे नाते शाहु फुले आंबेडकर चळवळीसी आहे हे नैसर्गीक नातेच बहुजनाना समजुन सांगण्याची आवश्यकता आहे. अन्याय अत्याचार सहन करणारे पशुप्राणी आहेत ते सांगतात, जे छाती करीय वोन साथ दियूँ – हाय नाकीय वोरो ढेरो पाडीयूृँ हिंमतवान संघर्षकारी माणसा सोबत मी आहे. जे गुलाम आहेत त्यांना मरण बरे. स्वाभिमानी माणसाचा सुकाळ करणा-या संत सेवालाल महाराजाची आवश्यकता आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook