जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Friday, 29 December 2017

बंजारा समाजाची कुलस्वामिनी-मोतीमाता देवी' चे 'जागृत देवस्थान'

*प्रेस नोट*

💐 *दि.२'जानेवारी रोजी "मांडवे दिगर,ता.भुसावळ' येथे 'मोतीमाता यात्रोत्सव' चे आयोजन.*💐

👉जामनेर(प्रतिनीधी)- *गारखेडा येथुन जवळच असलेल्या 'मांडवे दिगर,ता.भुसावळ' येथे 'बंजारा समाजाची कुलस्वामिनी-मोतीमाता देवी' चे 'जागृत देवस्थान' असुन या देवीचा यात्रोत्सव "मोतीमाता मंदिर ट्रस्ट,मांडवेदिगर"  तर्फे  शाकंभरी(पौष) पौर्णिमेला  'दि.२'जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.*
       *या मोतीमाता आईचे पंचक्रोशीतील भाविक भक्तांसोबतच संपूर्ण खांदेश व महाराष्ट्रातुन 'गावातील आप्तस्वकीय,नातेवाईक यांच्यासह बंजारा समाजासोबतच सर्व धर्मीय समाजबांधव हे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेत असतात.यासोबतच या यात्रोत्सवाला राष्ट्रीय बंजारा टायगर्स-संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था-पिंपळगांव कमानी(तांडा),ता.जामनेर' चे 'संस्थापक अध्यक्ष-मा.अशोकभाऊ चव्हाण,पोलिस पाटील-मा.रविंद्र पवार,तरुण-युवक,कार्यकर्ते,ग्रामपंचायत-सरपंच,उपसरपंच,सदस्य आणि पोलीस स्टेशन-भुसावळ यांचे खुप सहकार्य व चोख बंदोबस्त असते.म्हणून ही २ दिवसाची यात्रा अतिशय आनंदाने,उत्साहात व भक्तीमय वातावरणामधे पार पडत असते,यानिमीत्त यात्रोत्सवामधे परिसरातील विविध 'गोड मिठाई,खेळणी,भांडी,झोका(झूला),इ.प्रकारची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटलेली असतात.*
        *तरी,समाजातील सर्व भाविक भक्तांनी मोतीमाता देवीच्या दर्शनाचा व  यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा आणि परिसरातील विविधप्रकारच्या व्यापारी,हॉटेल चालक, मिठाई व खेळणी-भांडी दुकानदार यांनी आपली दुकाने आणावीत असे आवाहन 'मोतीमाता मंदिर ट्रस्ट-मांडवे दिगर,ता.भुसावळ' चे अध्यक्ष-श्री.सरिचंद पवार,उपाध्यक्ष-श्री.धनराज पवार,सचिव-श्री.पदमसिंग पवार,खजिनदार-श्री.चरणदास पवार,सह-सचिव-सौ.संत्रीबाई पवार,विश्वस्त-श्री.हरी पवार,अरुण राठोड,घनश्याम राठोड,श्रीमती.पारशीबाई पवार,यांनी केले आहे.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
---------------------------------------------
*प्रति,*
*मा.संपादक सो;*
*दैनिक.............*
*यांचे सेवेशी.*
विषय-ःवरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामधे प्रसिद्धीस द्यावी ही नम्र विनंती.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Share:

0 comments:

Post a Comment

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook