जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Thursday, 26 October 2017

विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गातील सर्व बांधव, सप्रेम जय सेवालाल....! महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दि.28/10/2014 रोजीचा अहवाल क्र.49 शासनास सादर केला असून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील यादी क्र. 1 व 2 (परिशिष्ट अ) मध्ये अनुक्रमे विमुक्त जाती-VJ/DT (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या 14 जाती (यादी क्र.1), भटक्या जमाती (ब) NT-B च्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या 23 जाती व विशेष मागास प्रवर्गातील अनुक्रमांक 7 वरील 1 जात (यादी क्र.2) अशा सर्व जाती क्रिमिलिअरच्या तत्वामधून वगळता येऊ शकेल अशी शिफारस केली आहे. या शिफारशीच्या अनुषंगाने सदर यादीतील समाविष्ट करण्यात आलेल्या VJ (A), NT (B) आणि SBC या प्रवर्गातील जाती/जमातींना क्रिमिलिअरच्या तत्वामधून वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. सदर जाती/जमातींना क्रिमिलिअर मधून वगळण्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत तरी जास्तीत जास्त शिफारसवजा पत्र किंवा ईमेल श्री.भा.रा.गावित, सह सचिव, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, दालन क्र.153 विस्तार, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई 32 यांना पत्राव्दारे अथवा bhaurao.gavit@nic.in या ईमेल आयडीवर तात्काळ पाठवून आपल्या समाजाला उचित न्याय मिळवून द्यावा व आपल्या मुला बाळांचा भवितव्याचा पाया मजबूत करावा ही समाज बांधवांना नम्र विनंती...!( सूचना व हरकतीची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर, 2017 आहे.) अपेक्षेसह, आपला ऋणानुबंधी, ⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇ खाली शिफारस वजा पत्राचा नमुना दिलेला आहे.

विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गातील सर्व बांधव,
सप्रेम जय सेवालाल....!
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दि.28/10/2014 रोजीचा अहवाल क्र.49 शासनास सादर केला असून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील यादी क्र. 1 व 2 (परिशिष्ट अ) मध्ये अनुक्रमे विमुक्त जाती-VJ/DT (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या 14 जाती (यादी क्र.1), भटक्या जमाती (ब) NT-B च्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या 23 जाती व विशेष मागास प्रवर्गातील अनुक्रमांक 7 वरील 1 जात (यादी क्र.2) अशा सर्व जाती क्रिमिलिअरच्या तत्वामधून वगळता येऊ शकेल अशी शिफारस केली आहे. या शिफारशीच्या अनुषंगाने सदर यादीतील समाविष्ट करण्यात आलेल्या VJ (A), NT (B) आणि SBC या प्रवर्गातील जाती/जमातींना क्रिमिलिअरच्या तत्वामधून वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
सदर जाती/जमातींना क्रिमिलिअर मधून वगळण्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत तरी जास्तीत जास्त शिफारसवजा पत्र किंवा ईमेल श्री.भा.रा.गावित, सह सचिव,  विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, दालन क्र.153 विस्तार, पहिला मजला,  मंत्रालय, मुंबई 32 यांना पत्राव्दारे अथवा bhaurao.gavit@nic.in या ईमेल आयडीवर तात्काळ पाठवून आपल्या समाजाला उचित न्याय मिळवून द्यावा व आपल्या मुला बाळांचा भवितव्याचा पाया मजबूत करावा ही समाज बांधवांना नम्र विनंती...!( सूचना व हरकतीची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर, 2017 आहे.)
अपेक्षेसह,
आपला ऋणानुबंधी,

⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
खाली शिफारस वजा पत्राचा नमुना दिलेला आहे.
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
              दशरथ हिरासिंग राठोड,
            मु पो फुलऊमरी ता मानोरा जि वाशिम
               दि. 25/10/2017
प्रति,
मा.श्री.भा.रा.गावित साहेब,
सह सचिव, विजाभज, इमाव व
विमाप्र कल्याण विभाग, दालन
क्र.153 विस्तार, पहिला मजला,
  मंत्रालय, मुंबई 32

विषय:- विमुक्त जाती (अ) व भटक्या जमाती(ब ) या प्रवर्गातील जाती-जमातींना क्रिमिलिअरच्या तत्वामधून वगळण्याबाबत.

महोदय,
महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती ह्या आजही हालाखीचे जीवन जगत आहेत, त्यांना आजवर योग्य तो सामाजिक न्याय मिळालेला नाही तरी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा दि.28/10/2014 रोजीचा अहवाल स्विकारून विमुक्त जाती (अ) मधील सर्व 14 जाती व भटक्या जमाती ( ब ) मधील 23 जमातींना क्रिमिलिअरच्या तत्वामधून त्वरीत वगळण्यात येऊन सामाजिक न्याय दयावा ही नम्र विनंती.
                    आपला विश्वासू,
               
              (दशरथ हिरासिंग राठोड)

Share:

0 comments:

Post a Comment

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook